Saturday, April 15, 2017

पाखरांना उड़ता आलेच नाही

मायेच्या आसऱ्या खाली ती जन्मास आली
अंडयाची केविलवाणी नाजुक पाखरं झाली
उडण्याची 'ट्रेनिंग' सुरु केली
पाखरं आता शाळेत गेली
आकाशात झेप घेण्याची 'क्लास' सुरु झाली
शिकता शिकता 'एग्जाम' आली
पाखरं आता पास होऊन पुढच्या वर्गात गेली
करता करता बोर्डची परीक्षा झाली
पाखरं आता कॉलेजला गेली
कॉलेज नंतर आता उडण्याची तयारी झाली
इतक्यात सौंसाराची जबाबदारी आली
पाखरं नोकरीला गेली
सौंसाराच व्याप वढ़ावत गेली
अन पाखरं 'सेटल' झाली
आता कुठे उड़णार इतक्यात लग्नाची घाई झाली
सौंसारची गाड़ी ढकलता ढकलता पाखरं आता वृद्ध झाली
वृद्ध जीवन जगता जगाता एक खंत त्यांच्या मनात राहिली
शेवटी, पाखरांना उड़ता आलेच नाही

-यश-

नियतीने परत तेच केले

नियतीने परत तेच केले
कहाणी तीच, पात्र बदलले
मन चंचल तेथेच स्थिरावले
जिकडे अवेळी दार बंद झाले

नियतीने परत तेच केले
सावळी तेथेच, पण झाड़ बदलले
दग्दगत्या उन्हात आसरा घेतला जेथे
तेथेच आगिचे वणवे पेटले

नियतीने परत तेच केले
अश्रु तेच, पण चेहरे बदलले
अपरंपार जेथे सुख नांदते
तेथे दुःखाचे डोंगर कोसळले

नियतीने परत तेच केले
घाव तेच, हत्यार बदलले
हळदीच्या लेपातही येथे
चूरचूरणारे मीठ चोळले

-यश-

हो.. मी परत येतोय

त्याच मैदानात.. तोच खेळ खेळाया
त्याच फ्रेम मध्ये.. तसाच बसाया
ते अपूर्ण कर्म पूर्ण कराया..
हो.. मी परत येतोय..

हरलेल्या मनाने.. आणी छोट्या मानाने
जसे सोडून गेलो होतो माझे ध्येय पुराने
पुनश्चः सुरु कराया अर्धवट कहाणी
हो.. मी परत येतोय..

जिथे सोडले तिथेच आहे, पुढे सरणे झाले नाही..
खीसे तेंव्हाच फाटले होते, ते भरणे झाले नाही
त्याच रिकाम्या हातानी आज, चार वर्षानंतर
हो.. मी परत येतोय..

हरलेली बाजी जिंकणे आता..
परत माघार घेणे नाही..
जे गेले त्यासाठी न रडता..
हो.. मी परत येतोय..

-यश-