नियतीने परत तेच केले
कहाणी तीच, पात्र बदलले
मन चंचल तेथेच स्थिरावले
जिकडे अवेळी दार बंद झाले
नियतीने परत तेच केले
सावळी तेथेच, पण झाड़ बदलले
दग्दगत्या उन्हात आसरा घेतला जेथे
तेथेच आगिचे वणवे पेटले
नियतीने परत तेच केले
अश्रु तेच, पण चेहरे बदलले
अपरंपार जेथे सुख नांदते
तेथे दुःखाचे डोंगर कोसळले
नियतीने परत तेच केले
घाव तेच, हत्यार बदलले
हळदीच्या लेपातही येथे
चूरचूरणारे मीठ चोळले
-यश-
No comments:
Post a Comment