पाहुनी तिला भांबावलो मी
दर्शन घेऊन सुखावलो मी
कित्येक वर्षांनी ती मज दिसली
काळजात माझ्या स्वप्ने फुलली
परत एकदा प्रेमाची ठीणगी पेटली
तुझ्या सोबतीची आशा पल्लवित झाली
मनाची अवस्था कासाविस होती
जाउन बोलायची हिम्मत नव्हती
देउनी धीर मजसी
घेतले पाऊल पुढे मी
तिचीही पाऊले पुढे चालली
मज पाहुन तीही हसली
धक्का बसून माझी पाउले लड़खडली
इतक्यात एक व्यक्ति मला सॉरी म्हणून गेली
आणि पुढे जाउनी तिला मिठीत घेतले
आणि माझ्यामनात नैराश्यचे थैमान मातले
No comments:
Post a Comment