एका मित्राच्या भावनेला कवितारूप देऊन काही शब्द..
प्रेम मी केलं होतं
घातही मीच केला
तु मला सर्वस्व दिले होते
मी समजण्यास वेळ केला
तुझ्या पासून दूर गेल्यावर
तुझं मूल्य समजलं
दैनंदिन कार्यवाहात मला
तुझ्या सोबतीचं मूल्य जाणवलं
परत परत मला तुझी आठवण यायची
तुझविण जगणं अशक्य हे कळालं
मला यायचं होतं परत जेव्हा
तू दार बंद केलं
फ़क्त दार उघडून एकदा म्हण मला
तुला मी माफ़ केलं
No comments:
Post a Comment